Friday, August 10, 2007

एच-४ मरठी मुलींचे मंडळ ऑनलाइन स्पर्धा - ३

विषय - आई
आई----आई हे नातं म्हणजे एक अद्वितिय भेट आहे देवाकडुन. देवाने स्वत: ची replacement म्हणुन आई बनवली. आई मधे आपल्याला सर्व इतर नाती भेटतात. माझी सर्वात खास मैत्रिणच आहे आई. शाळेत, कॉलेज ला असताना सर्व काही सांगायचे मी आईला. आणि आताही काही सांगावेसे वाटले की आईचीच आठवण येते.

खरं सांगु का? आपल्या सर्वांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असतो ज्याला आपण Idol म्हणतो आणि त्यासारखे आपण बनायचा प्रयत्न्य करतो. माझ्यासाठी ते व्यक्तीमत्व आई आहे.
मला तर कधी कधी वाटते आई फ़क्त आपल्या मुलांसाठी जगते. माझ्या जिवनातील काही क्षण तुम्हाला सांगावेसे वाटतात.

*******************************************************

माझे बाबा मी ६ वीत असताना वारले. त्यांना कर्करोग होता. मला तेव्हा जास्त काही कळायचे नाही पण आता विचार सुद्धा करवत नाही की आईने सगाळे कसे सांभाळले असेल. कारण मी आणि माझा भाऊ दोघे लहान होतो. खरं सांगु तर मला Leukemia चा अर्थ सुद्धा माहित नव्हता. आम्हाला एका नातेवाईकांकडे ठेऊन आई, बाबांना घेऊन hospital मधे जायची.

आणि बाबांनंतरही तिने आम्हाला कसे सांभाळले ते तिलाच माहीत. कारण आई ने कधी नोकरी केली नव्हती. Graduation पण पुर्ण नव्हते झाले. टंकलेखन शिकुन तिने मात्र रु. ६०० पगारावर टंकलेखकाची नोकरी केली. बाबा Government मधे होते त्यामुळे उशिरा क असेना ३ वर्षांनंतर आई ला Govt. मधे cleark ची नोकरि मिळाली. पण त्यासाठी सुद्धा तीला खुप त्रास झाला.

पण घराबाहेर पाय नं ठेवलेल्या महिलेने एवढे सगळे करणे म्हणजे....

आणि त्यात परत काही सासरकडुन कौटुंबिक त्रास होतेच. आईच्या सासरी सगळी फ़ाळणी झाली होती आणि ते आई ला काहिच द्यायला तयार नव्हते. ते म्हणते होते कि आम्ही रश्मी च्या लग्नाचा खर्च करु ना तुम्ही कशाल काळजी करताय वहिनी. मी तेव्हा फ़क्त १३-१४ वर्षाची म्हणजे कमीत कमी ७-८ वर्ष तरी होती अजुन. आणि त्यांचा काय भरोसा की की देतीलच की नाही ते. आईला गरज तर तेव्हा होती ना... आमचे शिक्षण करायचे होते आजुन.

आता माझ्या लग्नाच्या वेळेस तेच झाले ज्याचा संशय होता. काका काहिही मदत करायला तयार नव्हते.
त्यासाठी आई काका-काकुंच्या घरात काही दिवस राहीली होती. मी एक दिवस गेले आणि मी आई ला म्हटले "कशी काय रहातेय तु?" कारण कोणीही एक अक्षरही बोलात नव्हते आमच्याशी घरात. आई सोबत असुनही मी एका दिवसात रडवेली झाले आणि आई एका आठवड्यापासुन एकटि रहात होती तिथे. कशासाठी फ़क्त माझ्यासाठी. लग्नाला नाही म्हटले तरी पुष्कळ खर्च होतोच. आणि तोच एक शेवटचे कारण होते आईकडे तिचा हक्क मागायचा. तुम्हाला विश्वास नाही होणार मी हातावर ओली मेंधी घेउन लग्नाच्या आदल्या दिवशी दुकानात दागिने विकत घ्यायला गेले होते.

हे सर्व आई ने कोणासाठी केले? तिच्यासाठी नाही फ़क्त माझ्यासाठी.

आणि एवढे सर्व घडुनही एकही वाईट शब्द नाही त्या लोकांबद्दल.

*******************************************************

तसे बघायला गेले तर माझे सासर फ़क्त एक स्टेशन दुर आहे..ड़ोंबिवली- कल्याण. पण आता अमेरिकेत आल्यावर काय फ़ायदा एवढे जवळ सासर असुन. दर शनिवारी आई माझ्या फोनची वाट बघत असते. थोडा जरी उशिर झाला की लगेच विचार सुरु होतात तिच्या मनात. काय झाले असेल? बेरे नसेल वाटत का? बाहेर गेले असतील? मग फ़ोन आल्या आल्या प्रश्न सुरु "बेटा काय झाले? उशिर का झाला? बरे नाही वाटत अहे का? मी अताच ISD मधे जाउन तुला फोने लावणार होते."

मला आठवते संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही टेबलवर बसुन खुप गप्पा मारयचो. मला त्याची खुप आठ्वण येते. पुर्ण दिवसभर काय काय झाले ते एक्मेकींना सांगायचो. आणि एवढे थकून आल्यावर सुद्धा ति पुर्ण स्वयंपाक करायची. मी लग्नानंतर अजुन एकदापण नाही गेले भारतात परत. पण मी ठरवले आहे, जेव्हा पण जाईल जेवढे दिवस आईकडे असेल तिला एकही दिवस स्वयंपाक नाही करु देणार. कीती आराम मिळेल ना तिला...

कीतीही लवकर आपल्याला बाहेर निघायचे असेल तरीही मझ्या आधी उठुन डबा तयार करायची. इथे आपण एकटे असलो की स्वयंपाक करायचा कंटाळा करतो तेव्हा आई चे शब्द कानात ऐकू येतात "बेटा टेबल वर सगळं झाकुन ठेवलय, गरम करुन दुपारी वेळेवर जेउन घे."

आता सुद्धा फोनवर आई चे पहिले शब्द हेच असतात "सोनु कशी आहेस बेटा?" आणि माझे "हेलो शोनु, तु कशी आहेस? मी ठीक आहे"

बरोबर वाचले तुम्ही. मी सुद्धा आईला शोनु म्हणते. खरे साग़ु तर मी आई ला आई, मम्मी, मम्मा, शोनु, अम्मा ह्यापैकी कोणत्याही नावाने बोलवते. कोणत्याही नावाने हाक मारले तरी आई शब्दाचा अर्थ नाही बदलणार.

आपल्याला थोडेजरी बरे वाटत नसेल तर रात्रंदिवस जागुन आपली काळजी घेते ती आईच.

आपले मन उदास असेल तर उत्साह देते ती आईच.

तिला कीतीही बरे नसेल वाटत तरी आपले सर्व करते ती आईच.

आईच्या पवलांवर पाऊल ठेउन चालायचा प्रयत्न्य करु शकते मी फ़क्त.
एक सुंदर कविता आहे आईवर...

"आई शब्दातच सर्व काही सामावलं आहे
आई शब्दापुढं सर्व शब्द खुंटतात...
अडखळुन पडतात... अपुरे पडतात...
जुन्या आठवणीत जातो तेव्हा तुझे आईपण आठवते...
शब्दांनी वर्णन न करता येण्यासारखे...
हृदयातील भावना ओथंबुन वाहतात
त्या आईपणाने चिंब भिजलेल्य असतात
मनाच्या घसरगुंडीवरुन घरंगळतात
आठवणी फुलं होउन पडतात
भुतकाळात जमा होतात
कधीच नं कोमेजणारी ही फ़ुलं
आम्हाला साठ्वून ठेवायची आहेत
मनात... हृदयात...
त्या साठवण्या इतपत आम्हाला अफ़ाट शक्ती दे
ईश्वरचरणी हिच प्रर्थना..."

5 comments:

HAREKRISHNAJI said...

खर सांगु हे वाचल्या नंतर काय प्रतिक्रीया लिहायची हेच सुचेनासे झाले.

Unknown said...

रश्मी, आज प्रथमच आले इकडे. आणि "आई" वाचुन डोळे पाणावले बघ..आईची खरी माया, प्रेम, आपल्या बद्दलची कळकळ हे सगळ लग्न झाल्यावर कळतं. आणि परदेशात आल्यावर तर ना
तिचा जीव रमतो ना आपला. तु भारतात गेल्यावर आईचाच उत्साह जास्त असेल बघ तुला वेगवेगळे पदार्थ करुन खायला घालायचा!!

Unknown said...

तु Hartford, CT मधेच आहेस अजुन?? मी Sept मधे येतेय तिकडे.

RJ said...

हरेक्रीष्नाजी, सप्ना,

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

सप्ना, मी आता फ़्लोरिडा मध्ये आहे. तुला काही माहिती पाहिजे असली तर मी सांगु शकते.

-रश्मी

Deepali said...

rashmi tujhi aai vaachun kaay vatala te sangu ch shakat nahi... gala datun aala kharach...