Friday, August 10, 2007

एच-४ मरठी मुलींचे मंडळ ऑनलाइन स्पर्धा - १

विषय - एच-४ मरठी मुलींचे मंडळ चे सदस्यत्व
मला नक्की आठवत नाही की मी एच ४ मराठी मंडळ- ची कधी सदस्य झाले. एच ४ आणि मराठी हे दोन शब्द पाहिले आणि असे वाटले, इथे आपल्याला समदु:खी मैत्रिणी भेटतील. हो तुम्ही बरोबर वाचले समदु:खी... आता एच ४ वर आहे म्हणजे अजुन काय? सर्व रस्ते बंद म्हणजे नाही म्हटले तरी थोडेफ़ार दु:ख आलेच.

बुधवारी सगळे मिळुन अंताक्षरी खेळतात हे वाचुन मला पण वाटले सहभागी व्हावे पण नेमका मला तेव्हा वेळ नसतो आणि खरं सांगु मला जास्त गाणी सुद्धा येत नाहीत. वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसांचा विभाग बघितला तेव्हा वाटले, कशाला कोण न ओळखणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देईल. पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सकाळी तुमच्या सर्वांच्या शुबेच्छा बघुन मन भरुन आले. मझ्या वाढदिवसाच्या काही दिवसांपुर्वीच मी एच ४ मराठी मंडळ ची सदस्य झाले होते. म्हणजे असे म्हणता येईल की एच ४ मराठी मंडळ एक GIFT म्हणुनच मिळाले.. धन्यवाद एच ४ मराठी मंडळ तयार करणाऱ्यांना आणि सर्व सदस्यांना.

थोड्या थोड्या वेळाने काहि नविन आले आहे का हे बघत रहाते. मला वाटते सकाळी उठल्यानंतर दिवसाचा प्रारंभ आणि रात्री झोपण्यापुर्वी शेवट ह्याच कामाने होतो.

चांगली गोष्ट म्हणजे पाककृती विभाग. जेवायला काय करु असे विचारले की मझा नवरा पण म्हणतो एच ४ मराठी मंडळ वर बघ न काहि नविन पदार्थ आला आहे का? ;)

स्वप्ना ने ही ऑनलाईन स्पर्धेची युक्ती तर फ़ारच छान काढली आहे. त्यामुळेच पहिल्यांदा कहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते आहे.

पण आता कळले की एवढे शुद्ध मराठित लिहायला किती त्रास होतो ते :). आज-काल एवढे शुद्ध आपण बोलतहि नाहि.

आता तुम्हाला वाचायला कष्ट कीती पडतील महित नाहि. आता असले भारी मराठी लिहिले आहे तर कष्ट पण घ्यावेच लागतील ;)

No comments: