Friday, August 10, 2007

एच-४ मरठी मुलींचे मंडळ ऑनलाइन स्पर्धा - २

विषय - मैत्री

"यारो दोस्ती बडीही हसीन है
ये ना हो तो क्या फिर
बोलो ये जिंदगी है
कोइ तो हो राझदार
बे गरज तेर हो यार"

हे 'के. के.' ह्या गायकाचे गाणे ऐकताना मैत्रिचे सत्य अनुभवले जाते. असे म्हणतात लहानपणापासुन मित्र-मैत्रिणी जशा मिळतात तसेच मुलं घडली जातात. आयुष्यामधे आपल्याला एखादा व्यक्ती सापडु शकेल ज्याला काका, मावशी, भाऊ कींवा बहिण नाही पण मित्र-मैत्रिणी नसलेला व्यक्ती मला नाही वाटत शोधुनही सापडेल. शाळेत, कॉलेज मधे आपण दिवसतील अर्ध्यापेक्शा जास्त वेळ मित्र-मैत्रिणिं सोबत घालवतो.

मैत्री हे नाते सोडुन बाकी सर्व नाती आपण जन्म घ्ययच्या आधिच ठरलेली असतात. आणि कही खास नाती असतात ती मैत्रिपासुन सुरु होतात किंवा मैत्रिमधे रुपांतरित होतात.. आई सर्वात खास मैत्रिण असते असे म्हणतात ना ! हे झाले मैत्रिमधे रुपांतर. आणि मैत्रिपासुन सुरवात होणारे नात्याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे माझ्या मते नवरा-बायकोचे. आता ज्यांचे प्रेम-विवाह झाले आहेत त्यांना जास्त चांगले माहित असेल. माझे प्रेम-विवाह नाही पण आमचे लग्न अंतरराष्ट्रिय मैत्र दिनाच्या दिवशी ठरले. आम्हि सर्वात पहिले जेव्हा बहेर गेलो तेव्हा "Happy Friendship Day" म्हणुनच बोलायला सुरुवात केली :) .

तसे तर आपल्या आयुष्यात अगणित मित्र-मैत्रिणी असतात. पण काही खास असे असतात की जे सर्व सुख-दु:खाच्या वेळी आपल्यासोबत असतात. आपण कितीहि दुर असलो तरी त्यांना काही विशेष प्रसंगी फोन करायचे विसरत नाही.

आणि जरी खुप मित्र-मैत्रिणी असल्या तरी आपण नविन शोधतच असतो. आणि ह्याचसाठी आपण सर्वजणी एच ४ मराठी मंडळाच्या सदस्य आहोत.

ह्या जगात प्रेम आणि मैत्री ह्या दोनच गोष्टी आपण विचार न कराता करतो आणि मैत्रि हिच प्रेमाची पहिली पायरी म्हणजे तसे म्हणायला गेले तर सर्वात श्रेष्ठ हि "मैत्री".

मैत्री म्हणजे अतुट विश्वासएकमेकांचा एकमेकांवर..."!!!!!!!

तुम्हा सर्वाना अंतर्राष्ट्रिय मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!

No comments: